Marathi blogs : वाचाल तर वाचाल ! - New Marathi Blogs
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की "वाचाल तर वाचाल!"
इतर प्राण्यापेक्षा मनुष्यप्राण्याचा मेंदू अधिक तल्लख आहे. मनुष्य त्यामुळे बोलणे, लिहिणे वाचणे या क्रिया करू शकतो. वाचनाचे महत्व अफाट आहे. वाचनाने आपले व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते. वाचनाने मनुष्य बहुश्रुत होतो. त्याचे ज्ञान वाढते. वेळ सकारणी लागतो, जगात काय चालले आहे याची जाणीव होते. वाचनाच छंद, चांगली पुस्तके संग्रहित करण्याचा छंद जडतो. करमणूक ही होते. सखोल वाचनाने विषय चांगला समजतो. मनाला प्रसन्नता मिळते. चांगला वाचक चांगला वक्ता ही बनू शकतो.
वाचनातून भूतकाळ व वर्तमानकाळ दोन्हीही नजरेसमोर उभे राहू शकतात. आपले ज्ञान व प्रगती या दोहोंना द्विगुणीत करण्याचे कार्य वाचन करते, थोर नेत्यांची चरित्रे आपल्याला प्रेरणा देतात. मुद्रणकलेचा शोध हा एक सुंदर आविष्कार होय. वाचनाची अनमोल भेट त्याने आपल्याला दिलीय. त्यामुळे माणूस चितंनशील बनला. प्रगतीच्या वाटेवर अधिकाधिक वेगाने धावू लागला. शालेय पुस्तके, धार्मिक ग्रंथ, कथा, कादंबऱ्या, काव्य, मराठी ब्लॉग वाचन, नाटके, वर्तमानपत्रे मासिके ही सारी माध्यमे आपल्याला चांगल्या अर्थाने 'माणूस' घडविण्याचे काम करतात. शिवाय वाचनाला वयाचे बंधन नसते.
जोसेफ मॅझिनी म्हणतात -
"साहित्य सोनियाच्या खाणी
उघडवी देशियाच्या श्रोणी
विवेक वल्लीची लावणी
हो देही सैन्ध ।।"
वाङमय, साहित्य हे देशोन्नतीचे मुख्य साधन आहे. म्हणून वाचनाचे महत्व अगाध आहे. अज्ञान हा तर अधोगतीचा पाया आहे. वाचन हा प्रगतीचा पाया आहे.
"पुस्तके सांगतात गोष्ट
वाहून गेलेल्या दिवसांची
युगायुगांची, विश्वाची माणसांची
कालची-आजची-उद्याची,
एका एका क्षणाची!...."
पुस्तकात असातो क्षेपणास्त्रांचा विध्वंस
काळ्या कृत्यात बुडालेला महाभारतातला कंस
पुस्तकातल्या शब्दांना करूणेची झाक आहे
'सर्वे सन्तु निरामया' विज्ञानाची हाक आहे."
वाचायला सुरूवात करा म्हणजे मग पोहोचाल नेमक्या ठिकाणी..... अशी ही पुस्तके संकटसमयी खरे मित्र बनून धीर देणे हे कार्य ही पुस्तके करतात. थकलेलं मन पुस्तकात हरवतं, दुःख विसरतं. नाउमेद झालेल्या जीवनालाही जगण्याची उभारी पुस्तके देतात. १९९० हे वर्ष 'निरक्षरता निर्मूलन वर्ष' म्हणून पाळले गेले. जास्तीत जास्त लोक साक्षर व्हायला हवेत तरच वाचनाचे फायदे त्यांना मिळू शकतील. शब्दातून भावना भावनेतून संस्कृती आणि संस्कृतीतून प्रगती अशी वाटचाल वाचनाद्वारे शक्य होईल.
'मॅझिनी' चे चरित्र वाचून स्वातंत्र्यवीर सावरकर देशभक्तीच्या प्रेरणेने प्रेरित झाले. अनेक थोर व्यक्ती ग्रंथवाचनाच्या आवडीमुळे महान झाल्या. वाचनाचा नुसता छंद नव्हे तर वाचनाचे वेड असणारेही बरेच आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हैद्राबाद श्यामराव बहादूर यांचे ग्रंथप्रेम अतुलनीय आहे. नुकत्याच काही दिवसापूर्वी वाचन व संग्रह दोन्ही करणार एक आगळं व्यक्तिमत्त्व पहायला मिळाल. औरंगाबाद येथील आकाशवाणी केंद्राचे निवेदक श्री. अनंत काळे अनेक छंदी व्यक्तिमत्त्व वाचनांन समृध्द झालेलं अन् वाचन व लिखाण दोहोंसाठी प्रेरित करणारी ही व्यक्ती. त्यांच्या घरी हस्तलिखित वृत्तपत्र 'संकेत' च्या प्रती (त्यांचच प्रकाशन) तसेच प्रांतीय, परप्रांतीय, परदेशीय नियतकालिकांचा संग्रह, वृत्तपत्रीय पुरवण्यांचा संग्रह हे सारे पहायला मिळाले. त्यांचे ग्रंथालय वाचन किती करू शकतो ज्ञान किती वाढवू शकतो याची जाणीव करून देत होतं. पुस्तकात जगणारं पुस्तकात रमणारं किंबहुना पुस्तकांसाठी जगणारं अस आगळं नि वेगळं व्यक्तिमत्त्व श्री. अनंत काळे. त्यांची सारी पुस्तकं, त्यांचा सारा संग्रह जणू ओरडून मलाही हेच सांगू लागला - "वाचाल तर वाचाल !"
Marathi Blogs 2022 -
तुम्ही ही पोस्ट शेवट पर्यंत वाचल्या बदल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. ही पोस्ट आवडली असेल तर सर्वांना शेअर करा. मराठी भाषेतील knowledge घेत राहा , marathi blogs वाचत राहा. आमच्या blog ला भेट दिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद.
New Marathi blog.
खुप छान लेख आहे. वाचन करणे खरचं गरजेचे आहे. चांगले साहित्य वाचले की जीवन बदलत जाते. जगण्याला चांगली दिशा मिळते.
ReplyDelete